उपअधिक्षक भूमी अभिलेख (गट-ब) Dy.SLR पदाविषयी

2
3226
Print Friendly, PDF & Email

उपअधिक्षक भूमी अभिलेख (गट-ब) Dy.SLR

कामाचे स्वरुप :

जमीनीच्‍या मोजणी अर्जाच्‍या अनुषंगाने मोजणी काम करुन जमिनिच्‍या सीमा निश्चित करणे.

रस्त्‍्यांच्‍या सीमा, पांदण रस्ते, शेतजमिनिच्‍या बांधांचया हद्दी निश्चित करणे.

जमिनिंच्‍या, plots च्‍या विविध अभिलेखांच्‍या नक्‍कला पुरविणे.

भुसंपादन, कोर्टकमिशन, कोर्टवाटप, पोटहिस्सा मोजणी करुन संबंधितास अहवाल पाठविणे.

नगरभूमापन क्षेत्रातील (Property card) फेरफार मंजुर करणे (शेतजमीनीचा 7/12 असतो त्‍याच प्रमाणे शहरीभागात Property card असतो.)

विवादग्रस्त प्रकरणांमध्‍ये सुनावणी घेवून निर्णय देणे.

वेळोवेळी झालेल्या मोजणीच्‍या अनुषंगाने Record अद्यावत ठेवणे.

मोजणीच्या पद्धती :

E.T.S. मशिनद्वारे (Electronic Total Station)
Plane table द्वारे
Cross staff (शंकु साखळी)

भूमी अभिलेख खात्‍याची रचना :

शिपाई – Surveyor – निमतानदार/परिरक्षक भूमापक – शिरस्तेदार/मुख्‍यालय सहायक – उपअधिक्षक भूमी अभिलेख – जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख – उपसंचालक भूमी अभिलेख – जमाबंदी आयुक्त महाराष्‍ट्र राज्‍य.
प्रत्येक तालुका स्तरावर “उपअधिक्षक भूमीअभिलेख” हे कार्यालय प्रमुख म्‍हणून काम पाहतात.
नवीन तालुक्‍यास 1 अधिकारी + 15 कर्मचारी
जुन्‍या तालुक्‍यास 1 अधिकारी + 25 कर्मचारी असतात.

या विभागात काम करण्‍याच्‍या सकारात्मक बाजु :

कार्यालय प्रमुख (तालुका स्तरावरील सर्वोच्‍च अधिकारीता)

As compare BDO, CO, Tahsildar याप्रमाणे Public pressure, Political interfere जास्त होत नाही.

साचेबद्ध काम.

Promotion डायरेक्ट “जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख” म्‍हणून होतय.( equivalent to deputy collector)

शहरी भागात फेरफार प्रक्रियेवर नियंत्रण असल्‍यामुळे शहरी भागात काम करणे prestigious ठरते.

कार्यालयीन कामाचा जास्त व्याप नसतो. कार्यालयीन कामाचे योग्य नियोजन केल्‍यास अभ्‍यासाला खुप वेळ मिळतो.

रात्री अपरात्री (Police, Tahsildar, BDO, CO) यांप्रमाणे disturb होत नाही.

ज्‍यांना family life जगायचे आहे. त्‍यांच्यासाठी उत्कृष्‍ठ post आहे.

महिलांसाठी अतिशय चांगली post आहे.

बांधावरुन चाललेले वाद सोडविण्‍याची चांगली संधी.

UPSC चा अभ्‍यास करणा-यांसाठी किंवा वर्ग -1 पदासाठी प्रयत्‍न करणा-यांसाठी चांगली post आहे. कारण वेळ भरपुर मिळतो.

नकारात्मक बाजु :

Promotion होण्‍यास खुप विलंब लागतो. (16 ते 17 वर्षे)

Public contact फार जास्त नसल्‍याने तिकिशी glamorous पोस्ट नाही.

तहसिलदार, BDO, CO, PI या अधिका-यांसारखे वलय dyslr या पदासाठी नाही.
साचेबद्ध काम असल्‍यामुळे limited scope आहे.

भूमिअभिलेख खात्‍याविषयी लोकांच्‍या मनात असलेला पुर्वग्रह दुषितपणा. (नियमाप्रमाणे काम करुन देखील लोकांचे समाधान होत नाही.)

काही offices मध्‍ये record ची कमतरता, जीर्ण झालेले अभिलेख इ. मुळे अडचणी येतात.

                 निलेश उंडे
उपअधिक्षक भूमी अभिलेख,मुदखेड

2 COMMENTS

  1. ईतर पदांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली तर मार्गदर्शक ठरेल

LEAVE A REPLY