इच्छाशक्तीची शक्ती –प्रभाव

#Power_of_Willpower
#इच्छाशक्तीची_शक्ती

घड्याळात पहाटे पाच चे टोले पडतात. अंथरुणातून उठून तो दीर्घ श्वास घेतो. मग लगेच fresh होण्याची लगबग. या वेळेला आपल्या देशातील ऐंशी टक्क्यांपेक्षा जनता झोपलेलीच असते (प्रत्येकाच्या वेळा वेगवेगळ्या असू शकतात). पण ह्याचे हे सकाळचे रुटीन बनलेले. रूम सदाशिव पेठेत ज्ञान प्रबोधिनी समोर. उठून 15-20 मिनिटांमध्ये फ्रेश व्हायचे आणि पडायचे रूम बाहेर. थेट पर्वती टेकडीचा रस्ता पकडायचा. दुर्वांकुर चौकात मित्र वाट पाहत थांबलेलाच असतो. मग थेट running करत दोघेही पोहचतात पर्वती पायथ्याला.
एवढ्या सकाळी उठून दिवसाची सुरुवात करण्याची सवय त्याला आधी नव्हती. आधी मस्तपैकी, निवांत सव्वासात-साडेसातला उठायचे… निवांत गप्पा मारत आवरायचे, मग बाहेर पडून चहा-नाष्टा आणि मग लायब्ररीचा रस्ता धरायचा. त्याला खूप वाटायचे की सकाळी लवकर उठावे, व्यायाम करावा आणि मग दिवसाची सुरुवात अन पूर्ण दिवसही फ्रेश व्हावा, यामुळे आभ्यासत मोठी भर पडेल असंही वाटायचं!!! पण सकाळी लवकर उठणं जमत नव्हतं. एक प्रकारचा आळसही म्हणू शकता… दरम्यानच्या काळात वजनही बरंचस वाढलेलं… इतर मित्रांचं चेष्टेने चिडवणं वाढलं.
त्याचा एक मित्र रेग्युलर लवकर उठून running आणि व्यायाम करतो. तो नेहमी याला सल्ला द्यायचा की,
“अरे!! सकाळी लवकर उठत जा!!! येत जरा सकाळची हवा खायला…” पण सुरुवात काही होत नव्हती… परंतू सुरुवात तर कराविशी वाटत होती!!!

प्रत्येक व्यक्ती मध्ये इच्छाशक्ती (Willpower) नावाची गोष्ट असते. तिला ओळखावं लागतं. जोखून पाहावं लागतं. धाडस करावं लागतं. माणूस नेहमी भूतकाळ आणि भविष्याच्या गोष्टीत एवढा गुंतून जातो ना की, वर्तमानाकडे बरचसं दुर्लक्ष होतं. बहुतेक वेळा एखादी गोष्ट आपल्याला करायची असते पण,
ती मला जमेल का?
त्याची सुरुवात कशी करू?
लोक काय म्हणतील?
माझा खूप वेळ जाईल काय?
वगैरे-वगैरे असे अनंत निष्फळ प्रश्न आपल्याला मनाचा गुलाम बनवून टाकतात. यामुळे खूप लोक प्रयत्नच करण्याआधी Give up करतात.
त्याच्या बाबतीत मात्र गोष्ट वेगळी होती. काही दिवस मनाची तयारी केली. जशी युद्धाला निघण्यापूर्वी शस्त्र सज्जतेची करतात तशी. मित्राला सांगितले की, सवय होईपर्यंत मला call कर सकाळी 5 वाजता. मग ठरले तर….
सकाळी आला कॉल मित्राचा. मोठया आवाजात रिंग वाजतीये. साखरझोपेत असणारा ह्याला ताडकन जाग आली. डोळे सुद्धा पूर्ण उघडेनात. रोज सकाळी उशिरा उठण्याची सवय. उठू वाटेना. पण आता Commitment ची कसोटी होती. पटकन कॉल उचलला आणि तो हळूच म्हटला,
“सर, आलोच 20 मिनिटात दुर्वांकुर चौकात”.
चला झाली एकदाची रुटीन झाली सुरू!!!

दोघेही थोडी running + थोडी walking करत पर्वती पायथ्याला (1.8 k.m अंतर) पोचल्यावर जरा pause घेऊन टेकडी चढण्यास सुरू करतात. तिथे सकाळी-सकाळी जेष्ठ नागरिकांची गर्दीच दाटलेली असते. या गर्दीत देशाचे (भविष्य) ‘तरुण’ मात्र कुठेतरी तुरळक दिसतात. अगदी Endangered species सारखे.

असो!! या दोघांची मैत्री चांगलीच… टेकडी चढताना संवाद होतो… हा संवाद दिवसभराच्या रुटीनला धरून… परंतु वैचारिक पातळीवरचा…आणि एकप्रकारे SWOT Analysis चा…. या सगळ्या काळात मोबाईल पासून ते दोघे दूर असतात… बोलण्याच्या ओघात माथ्यावर पोचतात.
ऊंच पर्वतीची टेकडी. पेशवेकालीन वारसा इथे. पार्वती मंदिर, पेशवे museum, पेशवे गार्डन, कार्तिकेय मंदिर, विष्णू मंदिर आदी…
उंचीवरून चहूबाजूने दिसणारे गच्चच-गच्च इमारतींनी भरलेले पुणे शहर. त्या दोघांचा संवाद जरासा थांबतो. आणि काही वेळ मोकळ्या फ्रेश हवेच्या सानिध्यात ते व्यायाम करतात. आजूबाजूला inspiration म्हणून जेष्ठ नागरिक मोठं योगदान देतात. धावल्यानंतर, पायऱ्या चढून व्यायाम केल्यावर शरीरात नाविन्यपूर्ण तेजाची ऊर्जा निर्माण होते. अंतः प्रेरणेचीच शक्ती म्हणा ना!!!
मनाची एकाग्रता वाढलेली असते. त्यानं असा अनुभव कधी घेतला नव्हता पण त्याच्या इच्छाशक्तीने त्याला स्वतःची अजून ओळख झाली.
सर्व activity झाल्यावर पुन्हा परतीचा प्रवास. त्यावेळी पूर्वेकडून नव्या आशा आणि संजीवनी घेऊन सूर्यनारायण हळूहळू क्षितिजावर येत असतो. ह्याच क्षितिजाला साक्षी ठेवू मग पुन्हा संवाद सुरू होतो. तणावमुक्त झालेलं मन आणि शरीर यातून येणारे विचार अप्रतिम असतात. नाविन्याची रास बहरते. या रोजच्या संवादावर बरंचस लिहिण्यासारखं आहे. काही दिवसांनी “सकाळच्या मनांचा संवाद” नावाने लेखन येईलच.
माघारी परतताना मग निलायम सिनेमा पासून थेट टिळक रोडला पोचतो. सकाळी सकाळी दूधवाला, पेपरवाला, शाळेत जाणारी मुले, कामावर जाणारांची लगबग दिसतेच. चालत-चालत मग एक गोष्ट ठरवून केली जाते. ती म्हणजे आपल्या #Biological_clock ला प्रश्न करायचा आणि किती वाजलेत ते विचारायचे. त्याच्या मित्राची ही जुनी सवय पण अगदी जवळपास बरोबरच येणारी (कधीकधी 4-5 मिनिट मागे-पुढे). खूप वेळ खिशात ठेवलेला मोबाईल अचुकतेची साक्ष देतो… त्यालाही आता ते जमू लागलंय. अचूकता वाढलीय. हे सगळं शक्य झालं सकाळी लवकर उठण्याच्या इच्छाशक्तीनं… रोजचं हे जवळपास 4+ k.m. अंतराचं आणि 60-70 मिनिटांचं रुटीन…

त्याचे हे रुटीन regular बनलंय… वजनही कमी झालंय… दिवसात उपयुक्त सरासरी दोन तासांनी भर घातली जातेय (कारण ‘वेळ’ पैसे देऊन येत नाही हो!!). Tolerance चांगलाच वाढलाय, मन प्रसन्न राहतेय… मुख्य म्हणजे अभ्यासात चांगली भर घातली जातेय. चांगला अभ्यास होत असल्याने मिळणार आनंदच वेगळा आहे. रात्री वेळेचा अपव्यय न होता झोपही लवकर आणि चांगली लागतेय… लवकर उठण्याच्या आणि व्यायाम करण्याच्या आळसपणाच्या गुलामगिरीतुन मन आणि शरीर स्वतंत्र होऊन कार्यक्षम बनलंय… आधी खूप वाईट स्थिती होती असं नाही, पण सकाळच्या दोन तासांची भर मात्र नव्हती… आणि मुख्य म्हणजे स्वतःसाठी वेळ देता येतोय. 😊😊हे सगळं शक्य झालंय केवळ त्याच्या स्वतःच्या Willpower मुळं. मनाच्या तयारीमुळं. त्याला नावं ठेवणारी लोकं रोज सकाळी सात वाजतासुद्धा झोपलेलीच असतात.
त्याचं मात्र रुटीन जबरदस्त व्यसन बनलंय… ते म्हणतात ना, If there is a will there is a way.
अगदी तसंच!!!

©प्रभाव
(प्रमोद भाऊसाहेब वडवकर)

#Note: या कथेतील मुख्य पात्र ‘तो’ म्हणजे Mr. Piyush Chiwande (Deputy Collector 2018) आणि त्याचा मित्र म्हणजे ‘मी स्वतःच’ (प्रभाव)

(वरील रुटीन MPSC तुन निवड होण्यापूर्वीपासून आणि अजूनही चालू आहे)

#Note: इच्छाशक्ती दाखवायला आपण पुण्यातच असावे असे नाही. वरील प्रकारचे रुटीन आपण जगाच्या पाठीवर कुठेही असाल तरी ते आपणास करता येऊ शकते.


वरीलप्रमाणे मी आणि माझे भरपूर मित्र कोल्हापूर माध्ये pre IAS TRAINING Centre कोल्हापूर ला राजाराम कॉलेज कडे जायचो या प्रवासात संदीप माडकर (IPS) राहुल कर्डीले(IAS)अमित निकळजे (IRS) वैभव अलदार (IRS)सचिन पाटील (नायब तहसीलदार)ईश्वर जरांडे (IFS) सचिन कदम (IFS) सचिन गावडे (IFS) लिस्ट भली मोठी आहे..या सर्वांबरोबर मला सकाळी 6 ला जात आले..वरचे अनुभव घेता आले

6 comments

  1. Very nice. I am also go to running but after breakfast I fill so lazy ……when I reading book…..I sleeping. What to do?

  2. Truely inspiring I’m also trying this from tomorrow morning… Sir I know tomorrow never comes.. But after reading this it should have to come..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat